‘सुरजागड : विकास की विस्थापन?’ - पोलीस-नक्षल-सरकार-भांडवलदार यात चिरडल्या गेलेल्या सर्वसामान्य आदिवासींचे म्हणणे ठासून सांगणारे, त्यांचा आवाज उजागर करणारे संशोधन
महाराष्ट्रात अतिसुरक्षित समुदायातील माडिया हा समुदाय या भागात आहे. हा समुदाय नक्षलप्रभावित परिसरात पोलीस-नक्षल संघर्षात होरपळून निघालाच आहे, पण आता खाण संघर्षात पिचला जातोय. त्याचा जीवनसंघर्ष मांडणारे तरुण लेखक-संशोधक अविनाश पोईनकर लिखित ‘सुरजागड : विकास की विस्थापन?’ हे पुस्तक वाचून प्रत्येक लोकशाहीवादी माणूस अस्वस्थ होईल.......